भंडारदरा परिसरात वीज पडून दोघे जखमी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-भंडारदरा परिसरात मंगळवारी (१७ एप्रिल) दुपारी ४ च्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या कडकडासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यात पांजरे येथे वीज पडून शेतात काम करणारे दोन जण गंभीर जखमी झाले. वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसामुळे गहू व पेंढा यांचे मोठे नुकसान झाले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
भंडारदरा पाणलोट क्षेत्र तसेच बारी, वासळी, वारूंघुशी, पेंडशेत, चिंचोडी, शेडी या ठिकाणी मंगळवारी दुपारी ४ ते ५ या वेळेत जोरदार पाऊस झाल्याने या भागातील जनजीवन विस्कळित झाले. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. पांजरे येथे शांताबाई भोरू उघडे (वय ४०) आणि तुकाराम उघडे (वय ४५) हे एकच कुटुंबातील आदिवासी शेतकरी आपल्या घराजवळ काम करीत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास वीज पडून गंभीर जखमी झालेत्यांना तातडीने शेंडी येथील साई हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
त्यांच्यावर डॉ. सुधीर कोटकर यांनी प्राथमिक उपचार केले. त्याच वेळी घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे, सरपंच दिलीप भांगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना खासगी जीपमधून घोटी (नाशिक) येथे हलविले. सायंकाळी ७ पर्यंत पाऊस सुरूच होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.