आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही संचालकांमुळे अडचणीत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-नगर शहरातील आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ ही संस्था व संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय भ्रष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही संचालकांमुळे अडचणीत आले आहे. त्यामुळे येथे प्रशासक व प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रा. डॉ. श्रीधर दरेकर यांनी केली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
काही वर्षापूर्वी उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळत असल्याने नगर जिल्ह्यातूनच नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे उपचारासाठी व विविध प्रकारच्या शस्त्रकर्मासाठी रुग्ण येत होते. आता मात्र महाविद्यालयात रुग्णांऐवजी गुन्हेगारांचा अड्डा जमा होत असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
वर्ष २०११ मध्ये विद्यापीठाने व सीसीआयएम यांनी परवानगी नाकारल्याने ४५ विद्यार्थ्यांचे दोन वर्ष वाया गेले होते. याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून प्रत्येक विद्यार्थ्यास प्रत्येकी २५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, व संस्थेवर प्रशासक अथवा प्रशासकीय मंडळ नेमावे, अशी मागणी केली असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.