प्रत्यक्षदर्शी पुरावा न मिळाल्याने शिवसैनिकांवर कारवाई करण्यात अडचण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-केडगाव दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर झालेल्या दगडफेक व रास्ता रोको प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अद्याप शिवसेनेच्या एकाही नेत्याला वा कार्यकर्त्याला अटक करण्यात आलेली नाही. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. मात्र, कारवाई करण्यासाठी प्रत्यक्षदर्शी पुरावाच अद्याप मिळाला नसल्यामुळे शिवसैनिकांवर कारवाई करण्यात अडचण येत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दगडफेकीची घटना घडली त्या वेळी तेथे बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून या गुन्ह्याबाबत विशेष पथक माहिती घेत असल्याचे समजते.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केडगाव दुहेरी खुनाची घटना घडल्यानंतर तेथे आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्यावर दगडफेक केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह सुमारे सहाशे कार्यकर्त्यांविरुद्ध मागील आठवड्यात कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्यामधील बहुतांश पदाधिकारी हे नगरमध्ये दिसत आहेत. परंतु त्यानंतरही पोलिसांकडून अद्याप शिवसैनिकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
गुन्ह्यामध्ये ज्या शिवसैनिकांची नावे आहेत, त्यांची दगडफेक करताना पोलिस कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती वगळता इतर कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. त्यातच दगडफेकीबद्दल दाखल झालेला गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंगळवारी ठिय्या आंदोलन करून स्वतःला अटक करवून घेण्याचे शिवसेनेने नियोजन केले होते. मात्र, गुन्हा मागे घेण्याबाबत योग्य कार्यवाहीची ग्वाही दिल्याने हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती मिळतेय. तर, दुसरीकडे सक्षम पुराव्याअभावी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती विशेष पथकातील अधिकारी देत आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.