लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती सरकारजमा होणार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती थेट सरकारजमा करण्याची तरतूद कायद्यात केला जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये भ्रष्ट मार्गाने उभारलेल्या मालमत्तेवर टाच आणण्याचे अधिकार आहेत. परिणामी टाच आणलेल्या मालमत्ता आरोप असलेल्या व्यक्तीच्या ताब्यातच राहिल्याने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्ती त्या मालमत्तेचा पूर्ण उपभोग घेत असे. ही त्रुटी नव्या कायद्याद्वारे दूर केली जाणार असून येत्या पावसाळी अधिवेशनात त्याबाबतचे विधेयक मांडले जाणार अाहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शासकीय पदाचा दुरुपयोग करणे आणि उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्तीचा संचय करणे याबाबतच्या लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांच्या विरोधातील तक्रारीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ आणि फौजदारी कायदा (सुधारणा) अध्यादेश, १९४४ मधील तरतुदी नुसार कारवाई केली जाते. तसेच या कायद्यांनुसार भ्रष्टाचाराच्या अपराधाची न्यायचौकशी करण्यासाठी आणि शिक्षेसाठी विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करणे तसेच संबंधित मालमत्तेवर टाच आणण्याचीही तरतूद आहे. मात्र त्या अवैध मार्गाने कमावलेली संपत्ती आणि मालमत्ता सरकारी जमा करण्याची कोणतीही तरतूद या कायद्यांमध्ये नव्हती. त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही संबंधित आरोपीला या संपत्तीचा उपभोग घेता येत असे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती सरकारजमा करावी लागणार 
प्रस्तावित कायद्यानुसार सार्वजनिक पद धारण करणाऱ्या लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकाने भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून अपराध केला असेल. तसेच त्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ५० टक्क्यांहून अधिक किंवा १० लाख रुपये यापैकी अधिक असलेल्या रकमेएवढ्या किमतीची मालमत्ता धारण केली असेल तर ती सरकारजमा करता येणार आहे. त्यासाठी पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने न्यायालयाकडे अर्ज करणे गरजेचे असल्याचे या विधेयकात नमूद करण्यात आले आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.