व्यंकटेश पतसंस्थेतील दोन कोटींच्या अपहारप्रकरणी तिघाना अटक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील दोन कोटींच्या अपहारप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिघा जणांना अटक केली आहे.अटकेमध्ये श्यामकुमार शंकर खामकर, गणेश हरिभाऊ गोरे व गणेश अंबादास तांदळे यांचा समावेश आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
लेखापाल सोमाणी यांनी दोन महिन्यांपूर्वी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी या तिघांविरुध्द अपहाराचा गुन्हा दाखल केला.मुदतीनंतर पैशाची मागणी करुनही ते न मिळाल्याने ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन, उपोषण करुन वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला होता. ठेवीदारांचे पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणी सुभाष लुणिया, अजित बडे यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.