गोदावरीत बुडून शेवगावातील तरुणाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संदिप ऊर्फ नाना मुकुंदराव फडके (३५) यांचा रविवारी सकाळी मुंगी येथील गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. ते व त्यांची आई धार्मिक विधी संपवून गोदावरी तीरावर आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. संदीपच्या पायाखालची डगर कोसळल्याने ते नदीत पडले. पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आई उषाबाई यांनी जीवाची पर्वा न करता मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. त्यांनी साडी मुलाच्या दिशेने फेकली, पण संदीपच्या हातून ती निसटली. गाळ असल्याने आईला मुलापर्यत जाता आले नाही. आईने केलेल्या अथक प्रयत्नानंतरही संदीपवर काळाने झडप घातली. रविवारी दुपारी संदीप यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. संदिप हे शेवगावचे माजी सरपंच मुकुंदराव फडके यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.