वाळु तस्‍करांकडून तलाठ्याला मारहाण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वाळु चोरी करणारा ट्रॅक्‍टर व ट्रॉली कोपरगावकडे घेऊन जात असताना तलाठ्याला मोटारसायकली आडव्‍या लावुन अडवले. ट्रॅक्‍टरवरून गचांडी धरून खाली ओढून लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. तसेच शासकिय वाहनाचे नुकसान केले. खिशातील दोन हजारांची रोकड काढुन घेतली,अशी फिर्याद दिल्‍यावरून कोपरगाव ग्रामीण पोलिसात आरोपींविरूध्द गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सोमवारी दि.१६ एप्रिल रोजी दुपारी १.५५ वाजेच्‍या सुमारास माहेगाव देशमुख शिवालगत कोपरगाव - कोळपेवाडी रस्‍त्‍यावर वेळापुरचे तलाठी सोमनाथ भाऊसाहेब शिंदे हे वाळु चोरी करणारा स्‍वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्‍टर व ट्रॉली कोपरगावकडे घेऊन जात होते. 

यावेळी त्यांना नवनाथ जुंधारे, गणेश नवनाथ जुंधारे, अनिल नवनाथ जुंधारे (रा. काळगाव माळ जि. नाशिक) सागर लाटे, किरण हाके व इतर सात ते आठ जणांनी मोटारसायकली आडव्‍या लावुन रस्‍ता अडवला. ट्रॅक्‍टरवरून गचांडी धरून खाली ओढून लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. तसेच कुमार कन्‍हैय्या सिताराम वैष्णव व सुनिल साबणे हे साक्षीदार सोडविण्यास आलेले असता त्‍यांनाही मारहाण करून जखमी केले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
तसेच शासकिय वाहनाचे नुकसान केले. खिशातील दोन हजारांची रोकड काढुन घेतली. तलाठी शिंदे यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुरन. फस्‍ट ४९ / २०१८ भादंवि कलम ३९५, ३३२,३५३, ३७९ ३४१,४२७, ५०४, ५०६ शासकिय मालमत्‍ता नुकसान अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्‍हा दखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.