महापुरूषांच्या फलकाची विटंबना राहुरी तालुक्यात तणाव.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे अज्ञात समाजकंटकांनी महापुरूषांच्या अभिवादन फलकावर चिखल फेकून विटंबना केल्याने कोल्हार खुर्दमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
रविवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी महापुरूषांच्या अभिवादन फलकावर चिखल फेकून विटंबना केली व सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. सकाळी सात वाजेच्या दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंतर गावात मोठा जमाव जमा झाला. तसेच आजुबाजूच्या गावातील आंबेडकरी जनता घटनास्थळी जमा होवू लागली. वातावरण तणावपूर्ण झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड महामार्गावर रस्तारोको आंदोलन केले. 

जवळजवळ तीन ते चार कि.मी.पर्यंत वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या घटनेची खबर राहुरी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस कुमक घेऊन घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाच्या भावना ऐकून घेत गैरकृत्य करणाऱ्या समाजकटंकांना लवकरात लवकर शोधून काढू, असे सांगत सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
त्यांच्या आश्वासनानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयापुढे निषेध सभा घेण्यात आली, यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरपंच प्रकाश पाटील यांनी नागरिकांनी अशा अपप्रवृत्तींकडे दुर्लक्ष करून सामाजिक एकोपा कायम ठेवण्याचे व शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच तंटामुक्तीच्या बक्षिसाची रक्कम तशीच शिल्लक असून त्यासंबंधी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून या रकमेतून गावात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील असे सांगितले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.