बाळासाहेब पवारांचा छळ करणार्या 'त्या' चार सावकारांची नावे उघड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उद्योजक बाळासाहेब पवार यांना व्याजाच्या पैशाची वारंवार मागणी करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अखेर कोतवाली पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. नवनाथ विठ्ठल वाघ (रा. बुरुडगावरोड) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे. दरम्यान इतर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मुख्य खासगी सावकार नवनाथ विठ्ठल वाघ (रा.बुरूडगाव,ता.नगर), विनोद रणसिंग मल्हार चौक, यशवंत कदम, श्रीमती कटारिया जिजी (रा. नगर) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यातील नवनाथ वाघ याला अटक केली आहे. या प्रकरणी बाळासाहेब पवार यांची मुलगी अमृता हिने फिर्याद दिली आहे. भादंविक 306, 504, 506, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस अधिकारी नयन पाटील करत आहेत.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, उद्योग समूहाच्या विकासासाठी पवार यांनी चार खासगी सावकारांकडून पैसे घेतले होते. या पैशाला सावकारांनी १० ते १५ टक्केपर्यंत चक्रवाढ व्याज लावले होते. पवार यांना ओम गार्डन, भुईकाटा, वॉशिंग सेंटर या व्यवसायातून प्रतिदिन साडेतीन लाख रूपये मिळायचे. है पैसे मात्र सावकार पवार यांच्याकडे येऊन दररोज घेऊन जायचे. 

नवनाथ वाघ हा मागील एक वर्षांपासून पवार यांच्या पेट्रोल पंपावर तर कधी अरणगाव येथील शेतात येऊन त्यांच्याकडून बदनामी करणे व जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दररोज १ ते ३ लाख रूपये घेऊन जायचा. वाघ याच्या त्रासाला पवार कंटाळले होते. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
यशवंत कदम हाही मागील सहा महिन्यांपासून रात्री-अपरात्री येऊन पवार यांच्याकडून दररोज १ लाख रूपये घेऊन जायचा. कटारिया जीजी हिला महिन्याला २ तर विनायक रणसिंग यालाही काही लाखांत रक्कम द्यावी लागत होती. अशा सर्व सावकारांच्या व्याजाचे मिळून पवार यांना महिन्याला ७५ ते ८० लाख रूपये द्यावे लागत होते. 

इतर संस्थांच्या कर्जाचे हप्ते व्यवसायातून दैनंदिन मिळणाऱ्या पैशातून देणे शक्य होते. या चार सावकारांसह इतर काही सावकारांनी मात्र व्याजाच्या पैशासाठी मागील एक वर्षांपासून पवार यांना त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्यानेच पवार यांनी ३१ मार्च रोजी आत्महत्या केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.