नगरचे प्रमुख राजकारणी प्रथमच मोठ्या संख्येने अडचणीत !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगरमधील सर्वच पक्षांचे प्रमुख राजकारणी मोठ्या संख्येने एकाचवेळी गुन्ह्यात अडकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत याबद्दल अस्वस्थता असून सामान्यांना मात्र आता पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता आहे. पक्ष कार्यालये, नेत्यांची खासगी कार्यालये, त्यांच्या ताब्यातील संस्था येथील वर्दळही थंडावली असून शहरातील कार्यक्रम-उपक्रमांना लावण्यात येणारी राजकीय हजेरीही बंद झाली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केडगावमधील दुहेरी खून प्रकरणात राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध स्वरूपाच्या गुन्ह्यात अडकले आहेत. कोण खुनाच्या प्रमुख गुन्ह्यात आरोपी आहे, कोणी खुनानंतर झालेल्या दडगफेकीत तर काहींवर एसपी ऑफिसमध्ये तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल आहे. अटक झालेल्या आरोपींची संख्याही आता पन्नासच्या वर गेली आहे. ज्यांना अटक झाली नाही, त्यांना पोलिसांची नजर चुकवून राहावे लागत आहे. एका गुन्ह्यात सुमारे तीनशे तर दुसऱ्या गुन्ह्यात सुमारे सहाशे जणांना आरोपी करण्यात आले आहे. तीन आमदार, दोन माजी आमदार तसेच महापालिकेचे आजी-माजी पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक यांचा यामध्ये समावेश आहे. काही वकील आणि महिलासुद्धा यामध्ये आहेत.

नगर शहरात एवढ्या मोठ्या संख्येने राजकारणी मंडळी अडकण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरात राजकीय भांडणे नवीन नाहीत. जातीय दंगलींचाही इतिहास आहे. अशाप्रकारचे गुन्हे अनेकदा दाखल झाले आहेत. मात्र, त्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आणि प्रमुख पदाधिकारी अडकलेले नव्हते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीबद्दल शहरात वेगळी चर्चा आहे. याचा परिणाम शहरातील राजकीय हालचालींवर झाला आहे. अनेक पक्ष आणि नेत्यांच्या कार्यालयांत दररोज वर्दळ असते. सकाळी उठून नेत्यांच्या कार्यालयात हजेरी लावण्याचा नियम पाळणारे किती तरी समर्थक-कार्यकर्ते शहरात आहेत. सध्या एक तर त्यांचे नेते अडकलेले असल्याने ते कार्यालयात फिरकत नाहीत किंवा कार्यकर्तेही अडकलेले असल्यांना त्यांना येता नाही. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
शहरात शांतता...
केडगावमधील घटनेला शनिवारी आठवडा झाला. मागील रविवारी शिवसेनेने पुकारलेल्या जिल्हा बंदनंतर मागील आठवडाभर शहरात शांतता होती. एरवी विविध प्रश्नांवर होणारी राजकीय आंदोलने थंडावली आहेत. किरकोळ घटनांतून उद्भवणारे वाद, रस्त्यात, सिग्नलवर होणारी भांडणे, त्यानंतर नेते-कार्यकर्त्यांना केले जाणारे फोन, पोलिसांच्या कामात होणारा हस्तक्षेप असे प्रकार मात्र सध्या थांबले असल्याचे आढळून येते. त्यामुळे पोलिसांनाही दुहेरी खून व एसपी ऑफिस तोडफोडीसह केडगाव दगडफेकीच्या मुख्य घटनांवर लक्ष केंद्रीत करता येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.