शिवसैनिकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर 25 एप्रिलला उद्धव ठाकरे नगर मध्ये.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसैनिकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर 25 एप्रिलला सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे अहमदनगरला घटनास्थळी भेट देणार आहेत. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांचीही भेट उद्धव ठाकरे घेणार आहेत. अहमदनगर दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर नगरमधील शिवसैनिकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते अनिल राठोड, लोखंडे, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
उद्या सोमवारी नगरमधील हत्या झालेल्या शिवसैनिकांचे दहावं झाल्यानंतर शिवसैनिकांना अटक करण्याचे एसपींना आदेश असल्याचंही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यामुळे उद्या रामदास कदम, एकनाथ शिंदे, विशाखा राऊत आणि किशोरी पेडणेकर नगरमधील केडगावला जाणार आहेत.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
तसेच शिवसैनिकांचे अटकसत्र सुरु झाल्यास परवा मंगळवारी हजारो शिवसैनिक नगरहून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी वर्षावर दाखल होणार आणि शिवसैनिकांना अटक झाल्यास वर्षावर ठिय्या आंदोलन करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तसे आदेशच शिवसैनिकांना दिले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.