जखणगाव येथे राज्यस्तरीय मुलींच्या कुस्ती आखाड्याने होणार 'दंगल'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरापासून 10 कि.मी अंतरावर असलेले सुमारे 1500 लोकसंख्या असणारे जखणगाव येथे गुरुवारपासुन (दि.१९) तीन दिवसीय गोदडशावाली बाबा यात्रौउत्सवास सुरुवात होत आहे. यात्रेच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (दि.21) सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत जखणगाव व यात्रा कमिटीमार्फत भव्य पहिला राज्यस्तरीय खास मुलींचा कुस्ती आखाडा (हगामा) भरविण्यात येणार आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सर्व जातीधर्माचे लोक एकत्र व गुण्यागोविंदाने हा यात्रोत्सव साजरा करतात. हा उत्सव मोगल काळापासून राज्यात सुप्रसिद्ध असे आहे.अनेक वर्षापुर्वी या गावात बाबा गोदडशावली नावाचे एक अवलिया बाबा देवदुताप्रमाणे कार्य करीत होते.

त्यांचा दर्गा जखणगांव मधील ऐतिहासिक मस्जिद समोर असुन त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने दरवर्षी अक्षयतृतीयेनंतर जखणगांवमध्ये शेकडो वर्षापासून सर्व धर्म सहभागातून मोठा यात्रोत्सव भरविला जातो. पहिल्या दिवशी संदल काढला जातो व बाबांच्या दर्गामध्ये चादर चढवली जाते. दुसर्‍या दिवशी दिवसभर दर्गास्थळी हजारो भाविक दर्शनासाठी येतात व गूळ पोळीचा मलीद्याचा नैवेद्य दाखवितात, नारळ वाढवितात. तिसर्‍या दिवशी जियारतने कार्यक्रमाची सांगता होते.

पूर्वी गावात तिसर्‍या दिवशी कुस्ती हंगाम म्हणजेच आखाडा भरायचा राज्यभरातून नामांकीत मल्ल जखणगांवी येत. गेल्या काही दशकांत हा कुस्बंती आखाडा बंद पडला होता. यंदा मात्र तीन दिवस यात्रोत्सव भरविला जाणार असून त्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

गुरुवारी दि.19 एप्रिल रोजी संदल शुक्रवारी दिवसभर उरूस व याच दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत आनंदऋषी हाँस्पिटल अहमदनगरमार्फत जखणगांवमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
तिसर्‍या दिवशी शनिवार दिनांक 21 एप्रिल रोजी संध्याकाळी चार वाजता ग्रामपंचायत जखणगाव व यात्रा कमिटीमार्फत भव्य पहिला राज्य स्तरीय खास मुलींचा कुस्ती आखाडा (हगामा) भरविण्यात येणार आहे.यात आंतरराष्ट्रीय कुस्ती पटु मुली मल्ल सहभागी होणार आहेत. 

परिसरातील सर्व मल्ल मुली या कुस्ती महोत्सवात सहभागी होणार असून फक्त मुलींचा कुस्तीचा जंगी आखाडा (दंगल सिनेमा स्टाईल ) भरविण्यात आला असून विजेत्यांना ग्रामस्थांच्या तर्फ आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. तरी तमाम जनता, क्रिडा चाहते व भाविक भक्तांना जखणगांव गावकर्‍यांकडुन सादर निमंत्रण देण्यात येत आहे.या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबा गोदडशावली यात्रेनिमित्ताने यात्रा कमिटी तर्फे करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.