नव्या जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेरच हवे : आमदार वैभव पिचड

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर हेच नव्या जिल्ह्याचे मुख्यालय करावे, यासाठी १ मे रोजी अकोले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ठराव संमत करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांना संगमनेर जिल्हा कृती समितीतर्फे निवेदन देताना मीही बरोबर असेन. संगमनेर मुख्यालय न करता श्रीरामपूर किंवा शिर्डी झाल्यास अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील लोकांना आज आहे तेवढ्याच अंतरावर प्रशासकीय कामासाठी जावे लागेल. तसे झाल्यास अहमदनगरच जिल्हा राहिल्यास काय वाईट आहे, असा उपरोधिक प्रश्न आमदार वैभव पिचड यांनी केला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संगमनेर जिल्हा कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आमदार पिचड यांची भेट घेतली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जि. प. अर्थ व बांधकामाचे सभापती कैलास वाकचाैरे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शंभू नेहे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, सचिव यशवंत आभाळे, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, राहुल देशमुख उपस्थित होते. 

समितीशी चर्चा करताना आमदार पिचड म्हणाले, आमच्या आदिवासी व दुर्गम तालुक्यातून काहीही कामानिमित्त नगर येथे जायचे ठरले, तर सुमारे २०० किलोमीटर अंतर पार करायचे दिव्य करावे लागते. एका दिवसात जाऊन येणे शक्य होत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच संगमनेर हेच नव्या जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे, ही माझी व माजी मंत्री मधुकर पिचड यांची मागणी आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
आघाडी सरकारने पालघर जिल्ह्याची निर्मिती आदिवासींना जिल्ह्याचे मुख्यालय अडचणीचे होत असल्यानेच केली. त्याच धर्तीवर अकोले तालुक्यालाही नगर अडचणीचे असल्याने संगमनेर जिल्हा करावा. याप्रश्नी मी व जिल्ह्यातील आमदारांनी अधिवेशनात लक्ष्यवेधी सूचना मांडण्याची परवानगी पीठासन अधिकाऱ्यांकडे मागितली होती. मात्र, त्याला मंजुरी मिळाली नाही. 

म्हणून आम्ही विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. अतारांकित प्रश्नांतही हा विषय घेतला. मात्र, लक्ष्यवेधीला मंजुरी मिळाली असती, तर अधिवेशनात मंत्र्यांकडून उत्तर मिळाले असते. त्यामुळे शासनाचीही भूमिका समजली असती. कृती समितीला आमचे सहकार्य असून लवकरच साखळी उपोषणाला भेट देऊन संगमनेर जिल्हा होण्यासाठीची स्वाक्षरी देऊ, तसेच मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटायला जाताना बरोबरच जाऊ, असे आश्वासन आमदार पिचड यांनी दिले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.