माजी मंत्री पाचपुतेंच्या प्रयत्नांतून श्रीगोंदेतील रस्त्यांसाठी ६० कोटींचा निधी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदे तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी सुमारे ६० कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना माजी मंत्री पाचपुते म्हणाले, पालकमंत्री असताना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबाबत आराखडा तयार केला होता, पण मध्यंतरीच्या काळात ही योजना बंद झाली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पण पुन्हा भाजप सरकारने या योजनेसाठी निधी मंजूर केला असल्यामुळे तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पाठपुराव्याला सकारात्मक साद दिल्यामुळे शासनाचे आभार, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली.

या आराखड्यात ढवळेवाडी, ते टाकळी लोणार कोसेगव्हाण रस्ता ५ कोटी २० लाख, पारगाव वडाळी भानगाव रस्ता ६ कोटी ५२ लाख, राजापूर शेळकेवाडी ४ कोटी ५० लाख, सांगवी दुमाला ४ कोटी असे एकूण २६ कोटी २२ लाख रुपये प्रधानमंत्री सडक योजनेतून मिळाले आहेत.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
मुख्यमंत्री सडक योजनेतून तालुक्यातील काष्टी, बेलवंडी-वांगदरी मार्गे या रस्त्याच्या कामासाठी यापूर्वी सव्वा नऊ कोटी रुपये निधी मिळाला होता व रस्त्याच्या उर्वरित कामासाठी ७५ लाख रुपये, श्रीगोंदे ते टाकळी कडेवळीत भिंगान मार्गे या रस्त्यासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपये, श्रीगोंदे ते चांडगाव पाच कोटी, काष्टी ते आनंदवाडी, पेडगाव ३ कोटी, खाकीबा ते नगर-सोलापूर रस्ता ४ कोटी, बेलवंडीफाटा ते उक्कडगाव ३ कोटी, हिंगणी राजापूर माठ चिंभळा २ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे त्यामुळे तालुक्यातील रखडलेली सुरू होणार असून इतर रस्त्यासाठीही आपण निधी आणण्याचा प्रयत्न करू, असे पाचपुते यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.