श्रीगोंदा तालुक्यात स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून दोघांना लुटले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यात स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने बाहेरील गावच्या लोकांना बोलावून त्यांना मारहाण करून लुटण्याच्या घटना अनेकदा घडत होत्या. मध्यंतरी या घटना बंद झाल्या असतानाच शुक्रवार दि.१३ रोजी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील मनतेजर अल्ली मुजाफ्फर अल्ली, सय्यद या मामा भाच्यास स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून घायपातवाडी येथील जंगलात नेऊन मारहाण करत, त्यांच्याकडील २ लाख ९० हजार रूपये चार व्यक्तींनी बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत मनतेजर अल्ली, मुजाफ्फर अल्ली सय्यद यांच्या फिर्यादीवरून तीन लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी सय्यद हे आचारी काम करतात. सहा महिन्यांपूर्वी त्यांची चोपडा येथे श्रीगोंदा शहरातील एका नितीन (पूर्ण नाव माहीत नाही) नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. नितीन याने माझा मामा जुने वाडे पाडण्याचे काम करतो.या दरम्यान त्याला अर्धा किलो सोने सापडले असून ते विकायचे आहे. ते मी तुम्हाला अध्र्या किमतीत देतो असे सांगितले.सय्यद यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी त्यांचे मामा बिस्मिला शेख यांची नितीनची ओळख करून दिली.

त्यावर त्या नितीन श्रीगोंद्याला येऊन सोने पहाण्याचे सांगितले. त्यामुळे दि.५ रोजी या दोघांना नितीन नावाच्या व्यक्तीने त्यांना दुचाकीवरून येथील गणपती मळ्याच्या पुढे एका निमोनिच्या बागेत नेले तिथे तीनजन बसलेले होते. त्यातील एका जनाने निमोनिच्या पाठीमागे जाऊन एक अर्धा किलो पितळी पातेल्यामध्ये पिवळ्या रंगाच्या धातूचे अंगठ्या दाखवल्या. सोने खरे असल्याची खात्री झाल्यानंतर या दोघांनी आम्हाला एवढे सोने नको आमच्याकडे फक्त २ लाख ९०हजार रूपये आहेत. तेवढेच सोने घ्यायचे असल्याचे सांगितले. आणि पैसे घेऊन येऊन सोने घ्यायचे ठरले.

त्यानुसार शुक्रवार दि. १३ रोजी सकाळी शेख व सय्यद हे मामा भाचे ते पैसे घेऊन आले व राजा नावाच्या मुलासोबत विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून मांडवगण रोडने गणपती मंदिराच्या पुढे ११ नंबर चारीपासून घायपातवाडीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने जंगलामधील कॅनॉल जवळ गेले. तेथे तिघेजन होते. एक नितीन पूर्ण नाव माहित नाही व दोन अनोळखी व्यक्ती होत्या. त्यांनी या दोघांनी पैसे आणल्याची खात्री करून घेत त्यांना राजू नावाच्या व्यक्तीसोबत श्रीगोंद्याला जावून नाष्टा करून येण्यास सांगितले.नाष्टा करून पुन्हा त्याठिकाणी गेल्यानंतर तेथे नितीन व दोन अनोळखी व्यक्ती होत्या.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
शेख व सय्यद यांनी त्या लोकांना सोने द्या असे सांगितल्यावर त्यांनी या मामा भाच्यास पितळी पातेले दाखवले. त्यातील अंगठ्या नकली असल्याच्या लक्षात आल्याने, हे सोने नकली आहे आम्हाला नको असे म्हणून यात काहीतरी काळबैर असल्याचे लक्षात आल्यामुळे या दोघांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.परंतु नितीन व त्याच्या इतर तीन साथीदारांनी या दोघांचा पाठलाग करून त्यांना कॅनॉलमध्ये ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत. २ लाख ९० हजार रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली. त्यानंतर घाबरलेल्या शेख व सयद या मामा भाच्याने रात्री उशिरा श्रीगोंदा पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नितीन व राजा (दोघांची पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.