राहुरीत वडिलांच्या देखत वाळू माफियांनी केलं मुलीचं अपहरण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील अट्टल गुन्हेगार व वाळू तस्कराकडून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला वडिलांदेखत मुलगी झोपेत असतांना चारचाकी वाहनात उचलून नेल्याची घटना काल मध्यरात्री घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------

बारागव नांदूर येथे वाळू तस्करी करणाऱ्यांची मोठी दहशत आहे. भरदिवसा वाटेल त्या मुलीचं छेड काढतात. मात्र इथल्या नागरिकांमध्ये या वाळू तस्करींची इतकी दहशत आहे की गुन्हा दाखल करण्यासाठी हिंमत करून शकत नाहीत. वाळू तस्कर किशोर माळी आणि सुभाष माळी यांनी साथीदारांच्या मदतीनं घराबाहेर आईवडिलांसोबत झोपलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गाडीत टाकून पळवून नेलं. तिने आरडाओरड केली.

वडिलांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आरोपी मुलीला घेऊन निघून गेले होते. पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मात्र असं असतानाही आरोपी किशोर माळी राजरोजपणे फिरताना दिसतोय.. त्यामुळे हैदोस घालणाऱ्या या आरोपींवर कधी कारवाई होणार हा खरा प्रश्न आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
सदर घटना घडल्याने या भागात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस ठाण्याचे सहय्यक निरीक्षक दिलीप राठोड करत असून आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळणार असल्याचे तपासी अधिकारी राठोड यांनी सांगितले.याप्रकरणी अपहृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. २२०/२०१८ भादंवी कलम ३६३, ३६६ अ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.