श्रीगोंद्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पिंप्री कोलंदर येथील आबासाहेब साहेबराव निंभोरे (४८) यांनी बँकेच्या कर्जाला व तगाद्याला कंटाळून गुरूवारी मध्यरात्री आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुली व एक मुलगा असा परिवार आहे. 

-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
निंभोरे यांना साडेचार एकर शेती आहे. शेतीत कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवत होते. लिंबोणी व उसासाठी त्यांनी शिरूर येथील कार्पोरेशन बँक व स्थानिक सोसायटीकडून कर्ज घेतले होते. सुमारे १० लाखांच्या कर्जाला व होणाऱ्या तगाद्यांना कंटाळून त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. बेलवंडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.