स्व.गोपीनाथ मुंडेंना त्रास देणाऱ्यांविरूद्ध लढा सुरूच - पंकजा मुंडे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जोपर्यंत मी सामान्य जनतेच्या मनात आहे, तोपर्यंत माझ्या राजकीय अस्तित्वाला कुणीही धक्का लावू शकत नाही. स्व. गोपीनाथ मुंडेंना ज्यांनी त्रास दिला, त्यांच्याविरोधात आपला लढा सुरूच आहे, असे प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे पाथर्डीहून नाशिककडे जात असताना वंजारवाडी (ता. नेवासा) येथे कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या स्वागत व सत्कार समारंभात विविध संस्था, प्रतिष्ठाण व संघटनांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी समाजबांधव, भगिनी उपस्थित होते.

संत भगवानबाबा वामनभाऊ सामाजिक, धार्मिक प्रतिष्ठाणच्या वतीने महादेव दराडे, वंजारवाडी ग्रामपंचायत सरपंच सुधाताई दराडे, वंजारवाडी सहकारी पाणीवापर संस्थेच्या चेअरमन सुनंदा दराडे, उपसरपंच सुनिता दराडे, माजी सरपंच कैलास डोळे आदी पदाधिकाऱ्यांनी ना. मुंडे यांना सन्मानित केले.

यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हा चिटणीस सचिन देसरडा, रामदास गोल्हार उपस्थित होते. सरपंच डोळे यांनी वंजारवाडीच्या विकासासाठी विविध कामे मार्गी लावण्याची मागणी ना. मुंडे यांच्याकडे केली. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
सत्काराला उत्तर देताना ना. मुंडे म्हणाल्या, की या गावावर माझे विशेष प्रेम आहे. जनता हीच माझी खरी संपत्ती आहे. राज्यात शासनाच्या वतीने विविध कामे चालू आहेत. सुमारे १५ हजार किमी रस्त्याचे काम चालू आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपचा लौकीक वाढविला. त्यांचा वारसा मी पुढे नेत आहे. 

पारदर्शी काम व विकासामुळे भाजपचा लौकीक देशात वाढला आहे. जनता भाजपच्या पाठिशी आहे, असे ना. मुंडे म्हणाल्या. आमदार मुरकुटे यांनी ना. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यातील विकासकामे मार्गी लावू, असे सांगितले.

गडाख-मुरकुटे संघर्षावर भाष्य टाळले.
नेवासा तालुक्यात गडाख - मुरकुटे यांच्यात राजकीय संघर्ष चालू आहे. नेवासा तालुक्यातील स्थानिक राजकारणावर ना. मुंडे काहीतरी बोलतील, असे बोलले जात होते; परंतु त्यांनी तालुक्यातील राजकारणावर कुठलेही भाष्य केले नाही. ना. मुंडे मागील महिन्यात भगवानबाबा सप्ताहासाठी येणार होत्या; परंतु त्या येऊ नये म्हणून भाजपच्या लोकप्रतिनिधींनीच राजकीय शक्ती खर्च केली, त्यामुळे त्या आल्या नाहीत, अशी चर्चा तालुक्यात होती; परंतु आज ना. मुंडे वंजारवाडीत दाखल झाल्या. त्यामुळे ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.