आ. कर्डिलेंचा कोठडीतील मुक्काम वाढला,न्यायालयीन कोठडीत रवानगी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची आज मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना न्यायालयात हजर केले होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या सुनावणीअंती न्यायालयाने आमदार कर्डिले यांच्यासह इतर १७ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर याप्रकणात काल अटक केलेल्या चार आरोपींना १६ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.याप्रकरणी पोलीसांनी लोकसेवकास पळवून नेणे. पोलीसांची विनंती धुडकावणे तसेच चिथावणी देण्याची भादवि २२५, १५२ व १०९ ही कलमे वाढविले आहेत.

पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी कर्डिले यांना सोमवारी(दि.८ एप्रिल) रोजी अटक झाली होती. त्यानंतर मंगळवारी कर्डिले यांच्याविरोधात भा.द.वि.३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढविण्यात आले होते. त्यामुळे कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत वेळोवेळी वाढ करण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते.

आ. कर्डिलेंकडून वाहन हस्तगत 
आ. संग्राम जगताप यांना पोलिस अधीक्षक कार्यालयातून पळविण्यासाठी वापरलेले काळ्या रंगाचे वाहन आ. कर्डिले यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. कँप पोलिसांनी ह्युंदाई कंपनीचे असेंन्ट मॉडेल पोलिसांनी जप्त केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.