सिंह वाघाला गोंजारायला लागलाय

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सत्तेत असूनही वाघ सिंहाला विरोध करत होता. सिंह मात्र वाघाकडे दुर्लक्ष करत असे. मात्र, राजकीय परिस्थिती पाहता एकमेकांच्या सहकार्याशिवाय काही होऊ शकत नाही ही जाणीव होऊ लागली आणि विरोध कमी होत आहे. आगामी राजकीय परिस्थितीचा विचार करून आता तर सिंह वाघाला गोंजारायला लागला आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप आणि सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेवर काळेवाडी येथे झालेल्या सभेत चौफेर टीका केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळेवाडीतील एम.एम. शाळेजवळ बीआरटी रस्त्यालगत आयोजित करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात पवार बोलत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पवार म्हणाले, शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. आयुक्तालयाला मान्यता मिळाली; मात्र ते योग्य रीतीने राबवावे व शहराला फायदा व्हावा ही अपेक्षा आहे. सध्या तर 'दादाभाऊ दोघे मिळून खाऊ' असे सत्ताधाऱ्यांचे राजकारण सुरू आहे. यांना विचारणारे कोणीच नाही. पिंपरी-चिंचवड शहरात रिंगरोडचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. मात्र, सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसते. ज्या विकासकामांचे उद्घाटन होत आहे ती कामे राष्ट्रवादीच्या काळात सुरू झाली आहेत. बोपखेल लष्कराच्या रस्त्याचा प्रश्न अजूनही 'जैसे थे' आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.