श्रीरामपूरला वाळूच्या डंपरखाली सापडून क्लिनर ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात गोवर्धन शिवारात वाळूच्या डंपरखाली सापडल्याने विलास मंगेश पिंपळे (वय ३५, रा. सिन्नर, जि. नाशिक) या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ठेकेदारासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ठेकेदार राजेश गोपाळकृष्ण कपूर, संदिप मधुकर गायकवाड (दोघे रा. सिन्नर, जि.नाशिक), हैवा डंपर क्र. एमएच १५ सीके ४११५ वरील चालक (नाव माहिती नाही) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी : गोदावरी नदीपात्रातील वाळूचा ठेका सिन्नर (जि. नाशिक) येथील ठेकेदार राजेश कपूर याने घेतलेला आहे. पहाटे पाच वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात गोवर्धन शिवारातील गट क्र. १०१ च्या लगत वाळू डंपरच्या (क्र. एमएच १५ सीके ४११५) डाव्या बाजूच्या मागच्या चाकाखाली क्लिनर विलास पिंपळे चिरडला गेला. 

त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत पथवे व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह साखर कामगार रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. 

त्यानंतर रात्री उशिरा पोलीस नाईक शैलेंद्र सगळगिळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं.फर्स्ट ४७/१८, भादंवि कलम ३०४, ३७९, ४३१, १८८, ३४, पर्यावरण कायदा कलम ३/१५ अन्वये वरील तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातानंतर नदीपात्रातील अनेक वाहने रिकामीच माघारी दामटण्यात आली. तसेच रस्त्यात येणारी नदीपात्राकडे येणारी वाहनेही माघारी फिरल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले. 

अधिकारी कागदीघोडे नाचविण्यात मश्गुल.वाळूच्या गाडीखाली एका व्यक्तीचा जीव गेल्याची घटना घडली. मात्र, महसूल विभाग संबंधित ठेकेदाराने आजवर उचललेल्या वाळूच्या पावत्या जुळविण्यात मश्गूल असल्याचे दिसून आले. दरम्यान, घटना पहाटे घडल्याने रात्री वाळू उपसा सुरू असल्याचे यावरून सिद्ध होत असल्याने महसूलने सायंकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत वाळू उपसा बंद असल्याचे केलेले दावे फोल ठरले आहेत. .

रात्रीस खेळ चाले..!.कोपरगाव तालुक्यातून नाशिक जिल्ह्याला मोठ्याप्रमाणात वाळू पुरविली जाते. सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाळू उपशास मनाई असली तरी कोपरगावहून सिन्नर, नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. महसूल विभागाच्या पथकापासून वाचविण्यासाठी वाळूच्या वाहनांना टिपर तैनात केले जातात. यासाठी त्यांना खेपेमागे कमिशन ठरलेले असते. रात्रभर चालणाऱ्या या वाहतुकीतून रस्त्यावर धुराळा उडत असला तरी याच धुराळ्यातून अनेकांचे आयुष्य 'प्रकाशमान' झाल्याचे दिसून येते. महसूल विभागाचा अप्रत्यक्ष पाठिंब्याने गौणखनिजाची दररोज होणारी लूट थांबण्याऐवजी वाढत चालली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.