घरगुती वादातून विवाहितेचा गळा आवळून खून

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे रविवारी (दि.८) रात्री विवाहितेचा गळा आवळून खून करण्यात आला असून, या प्रकरणी पतीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वर कानिफनाथ वाघ (वय ३१) याने आपली पत्नी सुनिता ज्ञानेश्वर वाघ (वय २५) हिचा घरगुती वादातून नाक व तोंड दाबून खून केला. खून केल्यानंतर ज्ञानेश्वर वाघ याने पत्नीचा मृतदेह शेजारीच असलेल्या शेततळ्यात टाकून तिने आत्महत्या केल्याचे चित्र निर्माण केले.

मात्र या गोष्टीस विवाहितेच्या माहेरच्यांनी आक्षेप घेतल्याने पोलिसांनी तिचा मृतदेह औरंगाबाद येथे शव विच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालात विवाहितेचा मृत्यू नाक व तोंड दाबून झाल्याचे समोर आल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर वाघ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई सिध्देश्वर गोरे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.