विशाल कोतकरच्या सांगण्यानुसारच चौघांनी केली हत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या विशाल कोतकर व त्याच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार चौघांनी केल्याची कबुली मुख्य सुत्रधार संदीप गुंजाळ याने पोलिस तपासात दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संदीप गुंजाळसह संदीप बाळासाहेब गिऱ्हे, महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे (दोघे रा. शाहुनगर, केडगाव) व अन्य एक अशा चौघांनी केडगावातील दुहेरी हत्याकांड केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

 हत्या करणाऱ्या इतर तिघांची तसेच हत्या करण्यास सांगणाऱ्याची नावे पुढे आल्याने त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके प्रभावीपणे कार्यरत झाली आहेत. डोळ्यात तेल घालून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथके रात्रंदिवस कार्यरत आहेत.

पोलिसांकडे शरणागती पत्करणारा आरोपी संदीप गुंजाळ हा सुरूवातीला हत्याकांड एकटयानेच केल्याचे पोलिस तपासात सांगत होता. तसेच विसंगत माहिती देत पोलिसांची दिशाभुल करत होता. त्यामुळे तपासाला योग्य दिशा मिळत नव्हती.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
आरोपी गुंजाळ व एका साक्षीदाराकडे केलेल्या सखोल तपासामध्ये विशाल कोतकर व त्याचे नातेवाईक यांच्या सांगण्यावरून संदीप गुंजाळसह संदीप गिऱ्हे, पप्पू मोकळे व गिऱ्हे याचा आणखी एक मित्र या चौघांनी हे हत्याकांड घडवून आणल्याचे तपासात पुढे आले आहे. 

संदीप गुंजाळ याने संजय कोतकर यांच्यावर गोळीबार करत त्यांचा गुप्तीने गळा चिरला तर संदीप गिऱ्हे याने वसंत ठुबे यांना गोळी घातली व संदीप गुंजाळ याने त्यांच्यावर गुप्तीने वार करत गळा चिरला. संदीप गुंजाळ याने गुन्ह्याच्यावेळी वापरलेला मोबाईल फोडून फेकून दिला असता तो हस्तगत करण्यात आला आहे. 

तसेच संदीप गिऱ्हे याच्याजवळील गावठी कट्टा संदीप गुंजाळ याने लपवून ठेवलेला होता. हा गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच संदीप गुंजाळ याने पारनेर पोलिस ठाण्यात हजर होण्यापुर्वी पोलिस ठाण्याबाहेरील कचऱ्यामध्ये गावठी कट्टयातील चार जिवंत काडतुसे फेकून दिलेली होती. 

सदरची चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच संदीप गुंजाळ याने गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा बाबासाहेब केदार (रा. निमगाव वाघा, ता.नगर) याने पुरवीला असल्याने त्यास बुधवारी दि.११ रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती तपास अधिकारी पोनि. दिलीप पवार यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.