स्थायी सदस्य निवडीसाठी शुक्रवारी मनपाची महासभा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी (ता. १३) महासभा होत आहे. एकूण नऊ जागा भरल्या जाणार असल्याने त्यासाठीचे खलबते पक्षीय पातळीवर सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४, कॉंग्रेसचे ३ व शिवसेनेचे २, अशी राजकीय पक्षातून सदस्य निवड होणार आहे. शहरात शनिवारी सायंकाळी झालेल्या हत्याकांडात आमदार संग्रामभैय्या जगताप आणि आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे सदस्य निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उत्सुकता दिसत नाही. 


स्थायी समितीत सध्या सभापती सुवर्णा जाधव, संजय शेंडगे, अनिता राठोड, बाबासाहेब वाकळे, दत्ता कावरे, उषा नलवडे, समद खान यांच्यामार्फत काम सुरू आहे. महापालिकेचा अर्थसंकल्पही या सात सदस्यांनी मंजूर करून महासभेकडे पाठविला होता. जानेवारीत बाळासाहेब बोराटे, सचिन जाधव, कलावती शेळके, सुनीता भिंगारदिवे, मुदस्सर शेख हे पाच सदस्य निवृत्त झाले होते. स्थायीच्या रिक्त जागा भरण्याची तक्रार विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे यांनी नगरसचिव विभागाकडे केली होती. नगरविकास खात्यानेही या तक्रारीची दखल घेत स्थायीतील सदस्यांचा अहवाल महापालिका प्रशासनाकडून मागविला होता. रिक्त जागांपैकी राष्ट्रवादी ४, कॉंग्रेस ३ व शिवसेना २ असा पक्षीय कोटा आहे. भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोटा यापूर्वीच पूर्ण झाला आहे.

स्थायी समितीच्या निवडीसाठी शुक्रवारी होत असलेल्या महासभेकडे गटनेता कोणाची शिफारस करतो याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. पक्षीय पातळीवर देखील याबाबत खलबते सुरू झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची दुपारी यानुसार बैठक झाली. नगरसेविका वीणा बोज्जा यांनी पूर्वी दिलेला 'शब्द' पाळा याची आठवण करून दिल्याचे बोलले जात आहे. केडगाव येथील दुहेरी हत्याकांडात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्रामभैय्या जगताप आणि त्यांचे पिता आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये स्थायी सदस्यांच्या निवडीवरून उत्सुकता दिसत नाहीत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.