संगमनेर तालुक्यतील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यतील आश्वी बुद्रूक येथील शुभांगी अशोक शिंदे ( वय २२ ) हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.आश्वी बुद्रूक येथील अशोक माधव शिंदे यांची मुलगी शुभांगी इंजिनीअरींग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. 


गेल्या काही दिवसां पासून ती मनोविकाराने त्रस्त झाल्याने, तिच्यावर उपचार सुरु होते.आज सकाळी ती घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली. बराच वेळ ती खाली न आल्याने, वर जाऊन पाहिले असता, ओढणीने घराच्या छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळली.या बाबत अशोक शिंदे ( वय 50 ) यांनी आश्वी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तीच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.