आयसीसीचा निर्णय - चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.वन डेचा विश्वचषक असताना आठ संघांचा समावेश असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीची गरज आहे का, असा प्रश्न सातत्यानं विचारण्यात येत होता. त्या प्रश्नाला अखेर आयसीसीनं कोलकात्यातल्या बैठकीत एकमतानं उत्तर दिलं आहे.

2021 साली भारतात होणारी वन डे सामन्यांची चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द करून, आयसीसीनं त्याऐवजी ट्वेन्टी ट्वेन्टीच्या विश्वचषकाचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे चॅम्पियन्स ट्रॉफीऐवजी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक पाहायला मिळेल.

आठ संघांमधल्या वन डे सामन्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीला आयसीसीनं 2021 साली सोळा संघांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचा पर्याय निश्चित केला आहे. त्यामुळं आता 2020 साली ऑस्ट्रेलियात आणि 2021 साली भारतात लागोपाठ दोन ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकांचं आयोजन होईल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.