जुगार अड्ड्यावर छापा,माजी नगरसेवक,पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य गजाआड !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर मनमाड रस्त्यावरील साईतेज हॉटेलवर छापा टाकून जुगार व पत्ते खेळतांना माजी नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांसह अनेक धनीकांना पोलीसांनी रंगेहाथ पडले असून त्यांच्याकडून रोख रक्‍कमेसह वाहने असा 30 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.नगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने संयुक्तिकपणे ही कारवाई केली. छाप्यात जुगार व पत्ते खेळतांना 28 जणांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून रोख 1 लाख 83 हजार रुपये, 29 मोबाइल, सहा चारचाकी व दहा दुचाकी असे मिळून अंदाजे 30 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

आतापर्यंतची हि सर्वात मोठी कारवाई आहे. छापा टाकताच मोठी पळापळ झाली. चार ते पाच जण पळून गेले. अटक केलेल्यात हॉटेल मालक अस्लम सलीम सोनेवाला (मनमाड), रोहित हमीद खाण (येवला), वसंत लक्ष्मण वढे (येवला), वाल्मिक भगत कोळपे (कोळपेवाडी, कोपरगाव), बबलू अब्दुल शेख (मालेगाव), श्रीराम पंढरीनाथ लाटे (शिवूर वैजापूर), निस्सार अन्सार शेख (येवला), तुषार नारायण मेहारखाब (सुरेगाव), शकील आरिफ अन्सारी (नाशिक), विवेक अनिल घोडके (मनमाड), सनिश वसंत सोनवणे (वैजापूर), दयानंद रतन जावळे (येवला), संजय दिनकर निकम (मनमाड), कैलास हिरालाल जेजुरकर (अंदरसूल), समध रशीद शेख (एरंडगाव ,येवल), एत्तेफार्श्‍या गुलजार शहा (वैजापूर), निलेश गोपीनाथ लोंढे (येवला), निलेश रायभान कापसे (अंदरसूल), सुनील सूर्यभान खडांगळे (येवला), नवनाथ भास्कर मोरे (गोधेगाव, येवला), मनोज मधुकर पानगव्हाणे (उगाव ,निफाड), गुलाब महमद हनीफ शहा (मनमाड), मनोज प्रभाकर दानी (येवला), शिवा नाना हिरे (येवला), सचिन शामलाल बिवाल (येवला), वामन देवमन मेहरखांब (सुरेगाव), गंगाधर मधुकर चव्हाण (निफाड), व बालाजी सटवाजी मेढे (नांदेड) यांचा समावेश आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.