जिवेत शरद शतम : सुजितराव झावरे पाटील.

सुजितराव झावरे पाटील.... नुसते नाव उच्चारले तरी समोर उभे राहते ते एक देखणे, रुबाबदार, राजबिंडे व्यक्तीमत्व.. केवळ तरुणाईचेच नव्हे तर तालुक्यातील जनतेचे आशास्थान असलेल्या या रंजल्या गांजल्यांच्या नेत्याचा अर्थातच सुजित पाटलांचा शुक्रवारी वाढदिवस... पण ना कोठे फ्लेक्स, ना जाहिरातबाजी. कोणताही डामडौल गाजावाजा नाही. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून समाज उपयोगी उपक्रम राबवुन पाटलांचा वाढदिवस साजरा होत आहे. खरे तर भपकेबाज जाहिरातबाजीच्या जमान्यात हा वाढदिवस आदर्शवतच म्हणावा लागेल.


       माजी आ. स्व. वसंतराव झावरे पाटलांचा सुसंस्कृत वारसा सुजितरावांना लाभला आहे. वक्तृत्व, नेतृत्व व कर्तुत्व या तिनही गुण तर त्यांच्यात सामावलेले आहेतच. परंतू आदर्श राजकारण्यात आवश्यक असणारा तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायात भिंगरी हा आदर्श गुण देखील त्यांच्यात ओतप्रोत भरलेला आहे.
राजकारणापलीकडे पाटलांना जन्मजात लाभलेली दैवी देणगी म्हणजेच मधूरवाणी.. ! आपल्या सुंदर आवाजात त्यांनी गायलेल्या भक्तीगीत, भावगीत ते लावणी पर्यंतचा देखील श्रोतावर्ग आहे.

स्व. दादांप्रमाणेच स्वताःच्या हातुन स्वताःचा मोठेपणा सुजित पाटलांना कधीच आवडला नाही. श्रीमद भगवतगीतेचे अभ्यासक असणा-र्या पाटलांचा स्वतःच्या कर्तृत्वावर भरोसा आहे.तर जीवापाड जपणाऱ्या कार्यकर्त्यांवर प्रचंड विश्वास आहे. सत्ता असो की नसो, सुजित पाटलांच्या कामाचा धडाकाच वेगळा.. ! जिल्हा परिषद सदस्य असताना पाटलांनी राज्यातील पहिला नदीजोड प्रकल्प मतदारसंघात राबवला.

या पथदर्शी प्रकल्पाचे केवळ कौतुकच झाले नाही तर लाभक्षेत्राखालील शेतकऱ्यांना फायदाच झाला. कोणतीही सत्ता सोबत नसताना जिल्हा परिषद , राज्य सरकार ते केंद्र सरकारच्या कोटयावधी रुपयांच्या विविध योजनांचा लाभ त्यांनी तालुक्याला मिळवुन दिला.सत्ताधारी लोकप्रतिनिधींपेक्षा सुजितरावांचे विकासकामे, निधी कितीतरी पटीत मोठा आहे. याची प्रचिती गावोगावी दिसून येते.

सर्वसामान्य जनता, दीन दुबळयांची सेवा ही वृत्ती पाटलांच्या स्वभावात असल्याने आपला वाढदिवस कोणतीही जाहिरातबाजी न करता साधेपणाने, समाजहिताचे उपक्रम राबवुन साजरे करावे असे आवाहन त्यांनीच कार्यकर्त्यांना केले. नाहीतर अनेक यंत्रणा, संस्था हातात असताना फुकटची प्रसिध्दी कोणाला नको..? परंतू साधेपणाने वाढदिवस करून पाटलांनी वेगळा आदर्श निर्माण केला.

तालुक्यात सध्या वाढदिवसांचे पेवच फुटले आहे. फ्लेक्सबाजीचे ओंगळवाणे प्रदर्शन सुरू आहे.कोण , कोणाचा,फ्लेक्स का लावतो? जाहिरात का देतो?हा संशोधनाचाच भाग असला तरी पाटलांचा हा वाढदिवस म्हणजे दीपस्तंभच ठरेल यात शंकाच नाही. शेवटी एवढेच म्हणावे वाटते, नेता थोर जाणा , नेता थोर जाणा कलीयूगी... पाटील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
आपला एक मित्र...
Powered by Blogger.