खा,कोशियारी,व नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानंतर लवकर पेन्शनवाढ प्रश्न मार्गी लावणार - ना.संतोषकुमार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खा.कोशियारी समितीच्या शिफारशी, व केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल आता प्राप्त झाल्यावर देशातील इपीएस ९५ पेन्शनधारकांचा पेन्शनवाढ आदी मागण्याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी देशव्यापी पेन्शनर्स संघटना पदाधिकारी यांना निमंत्रित केल्यावर देण्यात आले.आज दि ८ मार्चरोजी देशातील महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना श्रीरामपूरसह अनेक संघटनाचे पेन्शनर्सचा मोर्चा नवी दिल्ली येथे मंडीहाउस ते संसदभवन पर्यंत पेन्शनवाढ मिळावी यासाठी मोर्चा नेण्यात आला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नेपाली हाउस चौकात पोलिसांनी मोर्चा अडविला.चौकात त्या ठिकाणी खा.विजयसिंह मोहिते पाटील,खा.धनंजय महाडिक,खा.मोहोम्मेद बशीर,केरळ,खा.ए संपत,श्रीमती गोएंका,एम बी राजेश,के के राजेश,[राज्यसभा] सोमाप्रसाद [राज्यसभा] पी के बिजू [म.प्र] कॉ अतुल दिघे,एम आर जाधव,सुभाष कुलकर्णी,आनंदराव वायकर,गोरख कापसे,रमेश गवळी,एस एल दहिफळे,आदींनी मोर्चासमोर भाषणे केली,व्यथा,अडचणी,मागण्या सविस्तर मांडल्या.मोर्चामध्ये देशातील आठ ते दहा हजार पेन्शनधारक महिला पुरुष सहभागी झाले होते.

सर्वांनी इपीएस ९५ लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.मोर्चा सुरु असताना खा.दिलीपकुमार गांधी यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी दुपारी दीड वाजता मोर्चा पदाधिकारी यांना चर्चेसाठी निमंत्रित केले.त्यानुसार खा.दिलीप गांधी,याचेसह,कन्वेन्रर धर्मराजन,कॉ अतुल दिघे,एम आर जाधव,सुभाष कुलकर्णी,आनंदराव वायकर,रमेश गवळी,गीरख कापसे,टी.के कांबळे,बलभीम कुबडे,बी आर चेडे,आदीचे शिष्टमंडळ कामगार मंत्र्यांना भेटले व सविस्तर चर्चा केली.व निवेदन दिले.एप्रिलअखेर सीबीटीची बैठक शिर्डी येथे घेण्यात येईल,त्याच वेळी कामगार मंत्र्यांचे उपस्थितीत देशातील पेन्शनर्स संघटना पदाधिकारी यांची बैठक घेण्याचे मान्य केले.पेन्शनवाढीसाठी खा.कोशियारी,समिती शिफारशी,व नवनियुक्त समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे ना..संतोषकुमार गंगवार यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.