अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले येथील पत्रकार अमोल शिर्के याने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कळसमधील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी कळस ग्रामस्थांनी गुरुवारी गाव बंद आंदोलन केले. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अल्पवयीन मुलगी घरात एकटी पाहून शिर्के याने तिच्या घरात घुसून अश्लील वर्तन केले. सुमारे १५ दिवस अगोदर त्याने खाणाखुणा करून विनयभंग केला असल्याचे मुलीने फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे .
 
दरम्यान, आरोपाला तत्काळ अटक करण्यात यावी, यासाठी कोल्हार-घोटी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अरुण वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे, राजेंद्र गवांदे, कारभारी वाकचौरे, सागर वाकचौरे, ईश्वर वाकचौरे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.फिर्यादी मुलगी दहावीच्या वर्षाला शिकत आहे. शिर्केच्या चुलत बहिणीने माझ्यावर दबाव आणून ही फिर्याद दिल्याचा जबाब लिहून दिल्याचे समजते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शिर्के याने सोशल मीडियावर बोगस चॅनेल काढला असून तालुक्यातील अनेकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून काही दिवसांपूर्वी मारामारीचा गुन्हा दाखल झाला आहे.आरोपीला तातडीने अटक करण्यात येऊन कारवाई करावी; अन्यथा कायदा हातात घेऊन आरोपीचा बंदोबस्त करू. तसेच शनिवारी अकोले शहर बंदचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व अमृतसागर सहकारी दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.