अहमदनगर मनपाला सात कोटी दहा लाख मिळणार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर विकास विभागाने एक टक्का मुद्रांक अधिभारपोटी अहमदनगर महापालिकेला सात कोटी १० लाख रुपये वर्ग करणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी ही रक्कम कोषागारातून तत्काळ वर्ग करावी, असे आदेशात म्हटले आहे. ही रक्कम मिळत असल्याने कर्मचारी युनियनने ती पगारावर खर्च करावी, अशी मागणी रेटून धरली आहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ही रक्कम वर्ग होताच आयुक्त घनश्याम मंगळे कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. राज्यातील २३ महापालिकांना नगर विकास विभागाने मुद्रांक शुल्क अधिभारापोटी सुमारे ५१४ कोटी ९४ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर महापालिकेचा त्यात समावेश आहे. 

महापालिकेला सुमारे सात कोटी १० लाख रुपये मिळणार आहे. ही रक्कम महापालिकेकडे तत्काळ वर्ग करण्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी यांनी कोषागारातून ही रक्कम वर्ग करावी, असे आदेशात म्हटले आहे. जकात रद्द पोटी ही रक्कम महापालिकांना देण्यात येते. या रकमेच्या वितरणापोटीचा जिल्हाधिकारी यांनी हिशोब स्वतंत्र ठेवावे लागणार आहे. 

दरम्यान, एवढी मोठी रक्कम वर्ग होत असल्याने महापालिकेचा ढासळलेल्या आर्थिक डोलाऱ्याला हातभार लागणार आहे. जीएसटीवरच्या अनुदानात कपात झाल्याने महापालिकेला तीनच लाख रुपये मिळाले आहेत. यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बॅकफूटवर गेली होती. 

यातून सावरण्यासाठी महापालिका धडपड करत होती. आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी याची दखल घेत विधीमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली. ही तांत्रिक बाब असून, लवकरच दूर होऊन कपात झालेले अनुदान दिले जाईल, अशी घोषणा सरकारने केली आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
जीएसटीवर कपात झालेले हे अनुदान देखील मिळणार आहे. त्यातच नगर विकास विभागाने एक टक्का मुद्रांक अधिभार देण्याचे जाहीर केले आहे. ते देखील तत्काळ वर्ग करण्याच्या सूचना आहेत. त्याचेही महापालिकेला सात कोटी दहा लाख रुपये मिळणार आहेत. 

मुद्रांक अधिभाराची रक्कम मिळणार असल्याने ती कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी द्यावी, अशी मागणी कर्मचारी युनियनने केली आहे. महापालिकेच्या २२०० कर्मचाऱ्यांच्या पगारावर सुमारे साडेसहा कोटी रुपये लागतात. मुद्रांकाची ही रकमेत कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकतात. 

कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले आहे. यातूनच कर्मचाऱ्यांचे पगार तत्काळ द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आयुक्त घनश्याम मंगळे मुंबई दौऱ्यावरून उद्या येत आहे. ते याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.