मी राजकारणातलाही डॉक्‍टर आहे - डॉ. सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विखे घराण्याने निस्वार्थीपणे पहिल्यापासूनच राजकारणापेक्षा समाजकारणाचा वसा घेतला आहे. त्यामुळे समाजाशी आमची नाळ घट्ट जुळली आहे. ''सब हमारे हम सबके'' हे ब्रिद वाक्‍य घेऊन आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहोत. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जे आजारी आहेत, त्यांच्यावर उपचार करुन तो बरा केल्यास मला आनंद मिळतो. त्यामुळेच माणसांबरोबरच आजारी कारखाने व संस्था आम्ही उपचार करत पुन्हा सुरू केल्या आहेत. मी राजकारणातलाही डॉक्‍टर आहे. राजकीय आजाऱ्यांना मी नक्कीच बरा करतो, त्याची काळजी कोणी करू नये, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी केले.


जनसेवा फाउंडेशन व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित डॉ. विखे पाटील मेमोरीयल हॉस्पीटल व मेडीकल कॉलेज, विळद घाट, नगर यांच्या संयुक्‍त विद्यमाने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्‍यातील बारागांव नांदूर येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्‌घाटन तंटामुक्‍ती समितीचे अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक सुरेश करपे, डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, माजी संचालक पंढरीनाथ पवार, उत्तमराव म्हसे, साहेबराव गाडे, सत्यवान पवार, मच्छिंद्र कोहकडे, भाऊसाहेब गाडे, तालुका दूध संघाचे अध्यक्ष तान्हाजी धसाळ, कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव निमसे, संचालक नामदेवराव ढोकणे, सुरसिंगराव पवार, शिवाजी सयाजी गाडे, विजय डौले आदी उपस्थित होते.

कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही
विखे म्हणाले, राहुरी तालुक्‍यावर माझे प्रेम आहे. तालुकाही विखे घराण्यावर प्रेम करतो. आमच्या घराण्याने सुरुवातीपासून समाजकारणाला जास्त महत्त्व दिले आहे. सर्वसामान्यांना उपचार मिळून त्यांचे आजार बरे व्हावेत व वंचीत घटकाला न्याय मिळावा, असा चांगला उद्देश या शिबीरांमागे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. त्यामुळे या शिबीरांशी कोणीही राजकीय अर्थ लावू नये. 

विखे पाटील साहेबांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय एकत्र 
कोणावरही उपचार करताना आम्ही पक्ष बघीतलेला नाही. एवढेच नव्हे तर माणसांबरोबर जिल्ह्यातील बंद पडलेल्या साखर कारखान्यांवर व सहकारी संस्थावर आम्ही उपचार करून ते देखील सुरू केले आहेत. त्यामध्ये सर्वांचे सहकार्य लाभत आहे. बारागाव नांदूरमध्ये या शिबीराचे निमित्ताने पद्मभुषण खासदार बाळासाहेब विखे पाटील साहेबांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय एकत्र आले, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.

डॉ. सुजय विखे हे मोठे समाजसेवेचे काम करत आहेत !
शिवाजी पवार म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून डॉ. सुजय विखे हे मोठे समाजसेवेचे काम करत आहेत. त्यांना देव मोठी शक्ती देईल, असा आम्हाला विश्‍वास आहे. राजकारणासाठी नाही तर, समाजसेवेसाठी विखे घराण्याने घेतलेले हे व्रत सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.

राहुरी तालुक्‍याला नवसंजीवनी मिळाली. 
साहेबराव गाडे म्हणाले की, दादांनी समाजकार्याचा वसा घेतल्यामुळेच राहुरी कारखाना सुरू होऊ शकला व राहुरी तालुक्‍याला नवसंजीवनी मिळाली. कारखाना बंद असल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी संकटात सापडला होता. त्यांना संकटातून बाहेर काढण्याचे काम सुजयदादांनी केले, हे जनता विसरणार नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

पद्मश्रींचा वारसा चालविणारे सुजयदादा
जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे म्हणाले की, पद्मश्रींनी सहकाराची मुहुर्तमेढ रोवून सर्वसामान्यांना न्याय दिला. त्यांचा वसा समर्थपणे सुजयदादा पुढे चालवत आहेत. सामाजिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सुरू केलेले काम हे त्यांच्यावर झालेल्या संस्काराचे प्रतीक आहे.

यावेळी डॉ. विखे पाटील यांचे हस्ते जागतिक महिला दिन असल्याने मुळानगर येथे महिलेसह दोन मुलींचे प्राण वाचवणाऱ्या शशिकला बर्डे, अश्विनी मोरे, शारदा शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रामध्ये उत्तम काम करणाऱ्या सुमारे सत्तावीस महिलांचा सत्कार करण्यात आला.

आभार पप्पू इनामदार यांनी मानले. हजारो रुग्णांनी या शिबीरात तपासण्या करुन घेऊन उपचार घेतला. तर ज्यांच्यावर पुढील उपचार करावयाचे आहेत, त्यांचे मोफत उपचार विखे पाटील मेमोरीयल हॉस्पीटल व मेडीकल कॉलेज, विळद घाट, अहमदनगर येथे केले जाणार आहेत, असे यावेळी डॉ.सुज विखे पाटील यांनी जाहीर केले.

यावेळी दत्तात्रय ढुस, महेश पाटील, केशव कोळसे, नंदकुमार डोळस, अर्जुन बाचकर, रविंद्र म्हसे, गोरक्षनाथ तारडे, भारत तारडे, उत्तमराव आढाव, बाळकृष्ण कोळसे, मच्छिंद्र तांबे, मधुकर पवार, सुरेश चौधरी, सरपंच प्रभाकर गाडे, मुळा प्रवराचे संचालक शिवाजी सागर, वसंतराव गाडे, राजेंद्र गाडे, दिलीप कोहकडे, पप्पू इनामदार, युवराज गाडे, जिल्लुभाई पिरजादे, जगन्नाथ गोपाळे, रमेश म्हसे, सुरेश बानकर, गणेश भांड, कैलास पवार, नारायण जाधव, बाळासाहेब पवार, बबलू इनामदार, आदम देशमुख, अंकुश बर्डे, बबलु इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.