महिलेच्या डोक्यात फावडे मारुन केले गंभीर जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी येथे एका महिलेच्या डोक्यात फावडे मारुन तिला गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार दि. ६ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. यातील आरोपी बाळासाहेब उर्फ यशवंत देवराम शिंदे याला घारगाव पोलिसांनी संगमनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जांभुळवाडी याठिकाणी मंगल गोरक्ष शिंदे ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पत्र्याचे शेड बांधण्याकरीता तिचे पती गोरक्ष देवराम शिंदे खड्डे घेत असताना त्याच दरम्यान बाळासाहेब उर्फ यशवंत देवराम शिंदे हा त्या ठिकाणी आला व म्हणाला, खड्डे कोणाला विचारुन घेता, या जागेशी तुमचा काही संबंध नाही असे म्हणून शिंदे याने त्याच्या हातातील फावडे मंगल यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सध्या या महिलेवर संगमनेर येथील खासगी दवाखान्यात औषध उपचार चालू आहे. याप्रकरणी मंगल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी बाळासाहेब उर्फ यशवंत शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल डी.एस. वायाळ हे करत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.