पाथर्डीत विजेच्या धक्क्याने बारावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील रमेश म्हातारदेव आव्हाड वय १७ वर्षे) या विद्याथ्र्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कोल्हार येथील रमेश आव्हाड हा करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयात बारावीत शिकत होता. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्याची बारावीची परीक्षा सुरू होती व बायोलॉजीचा शेवटचाच पेपर राहिला असताना सोमवारी सायंकाळी शेतात आई -वडिलांना मदत करत असताना त्याला विजेचा शॉक बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर करंजीच्या बारावी परीक्षा केंद्रातील सर्व परीक्षार्थींनी आव्हाड यास सामूहिक श्रध्दांजली अर्पण केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शांत , संयमी आणि हुशार विद्याथ्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दु:ख सर्वांना चटका लावून जाणारे आहे, असे विद्यालयाचे प्रा. किसन सुकटे, पर्यवेशक विठ्ठलराव मरकड या वेळी म्हणाले. रमेश आव्हाड याच्या मृत्यूमुळे करंजी, कोल्हार, चिचोंडी, शिराळ, या भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.