पाथर्डीत मुख्यमंत्री फडणवीस व शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर दक्षिण मतदारसंघात कॉंग्रेसचे डॉ. सुजय विखे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कॉंग्रेस आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच असल्यामुळे ढाकणे यांच्या मोर्चेबांधणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
येत्या दि. 25 मार्च रोजी पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत ढाकणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यादृष्टीने राजकीय वर्तुळात महत्व प्राप्त झाले आहे. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांचे चिंरजीव डॉ. सुजय विखे नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडून सोडवून घेणे, हे कॉंग्रेससमोर आव्हान आहे.

ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या बायोफोटोग्राफीचे प्रकाशन 25 ला होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोन दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ढाकणे यांनी उमेदवारीच्याच कारणावरून भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र अजूनही त्यांचे भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चांगले संबध आहेत. 

राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांचेही नाव चर्चेत आहे, मात्र आता ढाकणे यांनी ही तयारी सुरू केल्याने त्यांच्या उमेदवारीच्या स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानले जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.