कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीसाठी पूर्वीच्या निश्चित केलेल्या कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्जाबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी संबंधित तालुका उपसहाय्यक निबंधक, जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी कार्यालय, संबंधित बँक शाखा, गटसचिव, विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्याबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन वर्पे यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.