पूर्ववैमनस्यातून दोन गटांत मारामारी, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पूर्ववैमनस्यातून दोन गटांत बसस्थानकावर मारामारी व दगडफेक होऊन दुचाकी व चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. आठजण जखमी झाले. प्रकाश रामकिसन गोलेकर, प्रफुल्ल भोसले, रूद्राक्ष हुंबे, भावड्या सुरवसे, रोहित गोलेकर, संतोष गोलेकर, चम्या येवले,आकाश खेडकर, काका क्षीरसागर, किरण गोलेकर, काका सुरवसे यांच्यासह इतर २० ते २५ जणांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
करण संतोष चौघुले (वडारगल्ली, खर्डा) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, ६ मार्च रोजी रंगपंचमी असल्याने मित्रांबरोबर बसस्थानक परिसरात रंग खेळत असताना आरोपींनी दगडफेक करत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. काही लोक मध्यस्थीसाठी आले असता त्यांनाही दगडाने व दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केले गेले. त्याठिकाणी असलेल्या चारचाकी वाहनांची व मोटारसायकलींचीही मोडतोड करून मोठे नुकसान करण्यात आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला. मारहाणीत प्रकाश सुरवसे, राजकुमार चौघुले, अनुष चौघुले, रघुनाथ सुरवसे यांच्यासह ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नितीन पगार यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन दगडफेक आटोक्यात आणली. बेकायदा जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी प्रमुख ११ जणांसह ३० ते ३५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.