श्रीगोंद्यात दोन दारुड्यांचा बसमध्ये गोंधळ, वाहक-चालकाला शिवीगाळ

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दोन दारुड्यांनी एसटी बसचे वाहक, चालक व प्रवाशांना धक्काबुक्की करत धुमाकूळ घातला. श्रीगोंदे-नाशिक एसटी शहरातील बगाडे कॉर्नर येथे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता आली असता हा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्रीगोंदे-नाशिक (एमएच २० बीएल ४१७७) ही एसटी सकाळी डेपोतून निघाल्यावर पाच मिनिटांच्या अंतरावर बगाडे कॉर्नर येथे थांबली. दारू प्यालेले दोघेजण गाडीत बसले. गाडी सुरू होताच त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. म्हणत घुगलवडगावचे तिकीट द्या व पुढे आम्हाला उतरवा, असे म्हणत त्यांना वाहकास त्रास देण्यास सुरुवात केली. 

नंतर त्यांनी चालकाच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि चालकाची गचांडी धरून स्टेअरिंग व्हीलवरून त्याला जबरदस्तीने खाली उतरवून दिले. मग चालकाने पोलिस ठाण्याशी संपर्क करून पोलिसांना पाचारण केले. पोलिस येताच एक दारुडा पळून गेला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दुसरा तर्रर्र नशेत असल्याने त्याला पळता आले नाही. पोलिसांनी त्याला पकडून नाव विचारले असता बाळासाहेब सर्जेराव दांगडे (वय २८, राहणार घुगलवडगाव, तालुका श्रीगोंदे) अशी सांगितले. पोलिस ठाण्यात आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.