सव्वाशे कोटी खर्चून साई संस्थान उभारणार शैक्षणिक संकुल,अद्ययावत कॅन्सर रुग्णालय.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : श्री साईबाबा समाधी शताब्दीच्या निमित्ताने सव्वाशे कोटी रुपये खर्चून पंधरा हेक्टर जमिनीवर शैक्षणिक संकुल उभारण्याचा साई संस्थान विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला अाहे. त्याबराेबरच सुपर स्पेशालिटीसह जनरल रुग्णालय व सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल असलेल्या हेल्थ कॉम्प्लेक्सची निर्मिती साई संस्थान करणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
साई संस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतर डॉ. सुरेश हावरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. हावरे यांनी सांगितले की, राज्य सरकारने साई संस्थानला वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. येत्या जूनपासून ते सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. शिर्डीत भव्यदिव्य अशा शैक्षणिक कॉम्प्लेक्स निर्मितीसाठी संस्थानने निर्णय घेतला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पंधरा हेक्टर जागेवर व सव्वाशे कोटी खर्चाचा हा शैक्षणिक प्रकल्प साई संस्थान उभारणार आहे. साई संस्थानकडे सध्या दाेन रुग्णालये असून रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन या दोन्ही रुग्णालयांचा साडेचार कोटी रुपये खर्च करून तातडीने विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.