वाढदिवसानिमित्त नीलेश लंके यांचे १० मार्चला शक्तिप्रदर्शन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून तालुक्यात काम करत असून मी कोणालाही कार्यकर्ता किंवा समर्थक मानत नसून कुटुंबातील एक घटक म्हणून मानत आहे, असे सांगणारे सेनेचे पदच्युत तालुकाप्रमुख नीलेश लंके यांच्या समर्थकांनी १० मार्चला हंगा येथे लंके यांचा वाढदिवस शक्तिप्रदर्शनाने साजरा करण्याचे ठरवले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पक्षसंघटना वाढीसाठी मी अनेक वर्षांपासून काम करत आहे. आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा मी कार्यकर्ता आहे. जनता जर्नादन माझ्याबरोबर असल्याने मी हुजरेगिरी करणाऱ्यांपैकी नाही, असेही लंके म्हणाले. पारनेर येथील शेतकरी मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर तालुकाप्रमुख लंके व समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत घोषणाबाजी केली होती. या प्रकाराबाबत लंके यांनी माफीनामा सादर केला होता.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.