आयुक्‍तांनी राजकीय दबावाला बळी पडू नये.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महावितरणच्या वीज बिलाच्या थकबाकीमुळे सतत वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार महापालिकेवर आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 365 दिवसांत फक्त 130 दिवसच पाणीपुरवठा होतो व तोही कमी दाबाने. यामुळे महिलांसह नागरिक त्रस्त आहेत. आता उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होणार आहे. महापालिकेने महावितरणला 13 कोटी रुपये देण्याची जशी हमी दिली आहे तशीच हमी पाणीपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही अशी शहरवासियांना द्यावी, अशी मागणी ग्राहक संघाने आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी शिरीष बापट, डॉ. रमाकांत मडकर, मनोहर गोसावी, सुधाकर नगरकर, शिरीष चाटे उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, नगरकरांची जबाबदारीही मोठी असल्याचे आम्ही नाकारत नाही. आपणास निवेदन देताना आम्ही नगरकरांनाही विनंती करतो की, शास्ती माफी होणार नाही हे सत्य असून संपत्ती कराची थकबाकी आपण वेळेवर भरून महापालिकेस सहकार्य करावे. राजकीय साठमारीत जनतेचेच नुकसान होत आहे हे आपण लक्षात घ्यावे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आयुक्‍तांनी राजकीय दबावाला बळी पडू नये.
शहरातील जनतेचा रोष पत्करून एकदम पाणीपट्टीत 1 हजार 500 रुपये वाढ करण्याऐवजी दरवर्षी 500 रुपये वाढ करावी व जादा रक्कमही पाणी व वीज यांचे हप्ते भरण्यासाठी वापरावी. महापालिका हद्दीत बेकायदेशीर नळजोड व मालमत्ता कराची आकारणी न झालेल्यांची संख्या प्रचंड आहे. असे घरमालक शोधून कराची वसुली करावी. कोणाच्याही राजकीय दबावाला आयुक्तांनी बळी न पडता शहराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करावेत. ग्राहक संघ व शहरातील जनता आपल्या जनहितार्थ निर्णयाला निश्‍चितच पाठिंबा देईल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.