माळशेज घाटातील अपघातात संगमनेरचे दोघे ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कल्याण महामार्गावर माळशेज घाटात झालेल्या कार अपघातात संगमनेर येथील दोघेठार तर एक जण जखमी झाला. सोमवारी दुपारी हा अपघात झाला. यशोमंदिर पतपेढीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक जनार्दन डी. मते, संस्थेचे कार्यकर्ते संभाजी कारभारी डोंगरे (वय 53) अशी मृतांची नावे आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिवाजी गोपाळा वाळुंज हेजखमी झालेआहेत. तिघेही संगमनेर तालुक्‍यातील भोजदरी येथील मूळचे रहिवासी आहेत. ते मुंबईत असतात. तीन-चार दिवसांपूर्वी एका लग्न समारंभासाठी तेभोजदरी गावी आले होते. सोमवारी गावातीलच एका कार्यक्रमानंतर तेमुंबईला चालले होते. दुपारी चारच्या सुमारास माळशेज घाटात रोलरवर कार आदळली. यात जखमी झालेल्या जनार्दन मते व शिवाजी वाळुंज यांना आळेफाटा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तेथून मते यांना नाशिकफाटा (पुणे) येथील हॉस्पिटलला हलवण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिवाजी वाळुंज यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. संभाजी डोंगरेयांचेही सोमवारी संध्याकाळीच निधन झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.