योगीराज गाडे हा जनतेतला खरा नगरसेवक !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सावेडी येथील प्रभाग क्र ११ मधील समतानगर राज्य कर्मचारी सोसायटीत चालू असलेल्या रस्त्याचे कामाची पाहणी महापौर सुरेखा कदम यांनी केली. यावेळी प्राचार्य अशोक जाधव, पुष्पा जक्का, जयश्री मगर, प्रा संध्या जाधव ,ज्योती अणेकर, वैशाली कुलकर्णी, विजय मगर, सुनीता जक्का, छाया कुलकर्णी, मंदाकिनी बर्डे, प्रज्ञा रसाळ, अलका बर्डे, चंद्रकांत खुळे, राहुल वाणी, रविंद्र वाणी, महेश कुलकर्णी, श्री घावटे ,प्रभागाचे नगरसेवक योगीराज गाडे, शिवसेनच्या महिला जिल्हाप्रमुख आशा निबाळकर, उषा ओझा ,उमेश काळे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून रोलर फिरवून आज डांबर टाकण्यात आले त्याची पाहणी करण्यासाठी महापौर कदम यांनी भेट दिली. यावेळी बोलताना येथील नागरिक म्हणाले योगीराज गाडे हा जनतेतला खरा नगरसेवक आहे. आमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो, प्रभागात त्याची रोज सकाळी फेरी असते, आमच्या भागात सतत येतात व कधीही फोन करा ते रिसिव्ह करतात व कामे मार्गी लावतात, या आधी इतर नगरसेवक कधीच या ठिकाणी फिरले नाही म्हणून आम्ही पोटनिवडणुकीत गाडे ना निवडून दिले व त्यांच्या बद्दल आलेली विरोधातील बातमी आम्ही दिलेली नाही व विरोधकांनी त्याचे राजकारण केले असे नागरिकांनी महापौरांना सांगितले.

श्री गाडे म्हणाले मी जनतेसाठी जगतो व त्यांच्या साठी काम करतो ४० वर्षे येथे रोड नव्हता, तो होत आहे. यापूर्वीच्या कोणत्याही नगरसेवकाने कधी तो करण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही तो केला , राष्ट्रवादीचा कार्यकर्ता लोटके प्रकरणामुळे ठेकेदाराचे बिल निघत नाहीत, अनेक विकासकामे खोळंबली आहे, प्रभागातील कामे न होण्यासाठी राष्ट्रवादीचा एक बडा नेता प्रशासनावर दबाव आणतो मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे अश्या परिस्थितीत येथील राष्ट्रवादीच्या अजिक्य बोरकर यानी मनपाची फसवणूक केली व चुकीच्या पद्धतीने लाखो रुपये मानधन घेतले आहे ते सुद्धा ३ वर्षे होऊनही परत केले नाही हा जनतेचा कष्टाचा पैसा त्यांनी प्रथम भरावा व महापालिकेत त्याला साधा सहीचा अधिकार हि नाही म्हणून त्याने आदोलंना बद्दल बोलू नये. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या कॉलनीत २०१३ व पोटनिवडणुकीत पांगरमल दारू कांडातील जितू गंभीर व विद्यमान आमदाराने रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी येथील प्रभागातील दहा कॉलनी मध्ये रस्त्यासाठी खडी टाकली होती व निवडणूक हरल्याने ती सहा महिन्यांनी परत उचलुन नेली हे नागरिक विसरले नाहीत . या नंतर संग्राम भैय्या फाऊंडेशन चा व राष्ट्रवादीचा जितू गंभीर तीन वर्षे प्रभागात फिरला नाही उलट बनावट दारू ने स्वतःचे पोट भरून १४ लोकांचे बळी घेतले. शिवसेना जनतेशी बांधील राहून विकास कामे करती तर राष्ट्रवादी फ्रॉड नगरसेवक, आरोपी जितू गंभीर, पथदिवे घोटाळ्यातील लोटके असे कार्यकर्ते देते व त्याच्याशी बांधील आहे व सध्या नगर शहरातील राष्ट्रवादी म्हणजे - चोराच्या उलट्या बोंबा मारतात असा आरोप ही गाडे यांनी यावेळी बोलताना केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.