केके रेंजसंदर्भात झावरेंचे संरक्षणमंत्र्यांना साकडे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- के.के. रेंजसंदर्भात सुजित झावरे पाटील यांनी माज़ी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या समवेत देशाचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे. या वेळी पारनेर, नगर, राहुरी तालुक्यातील के.के. रेंजसंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी श्री. भामरे यांनी संरक्षण विभागाला त्वरित के. के. रेंजबाबत बैठक घेण्याचे आदेश दिले असून, लवकरच दिल्ली येथे संरक्षण विभागाची बैठक घेण्यात येणार आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सुजित झावरे यांनी तालुक्यातील ढवळपुरी, पळशी, वडगाव सावताळ, गाजदीपूर गावांचा के. के. रेंजमध्ये समावेश न करण्याबाबत सात हजार ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले. पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील जमिनी भारतीय सैन्याच्या प्रक्षिणासाठी भू -संपादन होणार असल्याने याबाबत राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत देशाचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निवेदन दिले आहे.

के. के. रेंज (लष्कराच्या प्रशिक्षणासाठी) साठी पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील जमिनी संपादित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, नगरचे जिल्हाधिकारी यांनी संरक्षण खात्याच्या सूचनेनुसार या भागातील जमिनीची मोजणी करून ७-१२ वर नोंद घेण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पारनेर राष्ट्रवादीच्या वतीने देशाचे माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांना स्व. वसंतराव झावरे यांच्या वासुंदे येथील वर्षश्राध्द कार्यक्रमात निवेदन दिले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
के. के. रेंजचा भू संपादनाचा विषय १९९४ पासून येत असून, यामध्ये पारनेर तालुक्यातील ढवळपुरी, पळशी, वनकुटे, वडगाव सावताळ व गाजदीपूर या गावांतील जमिनीचा व गावातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न असून, या ठिकाणी भू संपादन होऊ नये म्हणून तत्कालीन पंचायत समिती सभापती व माजी आमदार वसंतराव झावरे यांनी देशाचे संरक्षणमंत्री असताना शरद पवारांना साकडे घातले होते. 

त्यावेळी पवार यांनी आदेश देऊन या जमिनीचे भू संपादन रोखले होते ; परंतु आता या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जमिनी संपादित करण्याबाबत हालचालींना वेग आल्याने सुजित झावरे यांनी हा प्रश्न शरद पवार यांच्यापुढे मांडला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.