निलेश लंकेची तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी.​शिवसेना पारनेर तालुका​ प्रमुखपदी बंडू रोहकले​ !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ​शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पारनेर तालुका प्रमुखपदी विकास भाऊसाहेब रोहोकले यांची नियुक्ती झाली आहे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे कळविले आहे​.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गेल्या आठवड्यात झालेल्या आ.औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली होती.उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर दोन गटांमधील वादाने हिंसक वळण घेतले. आमदार विजय औटी यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती.

उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर हा राडा झाल्याने पक्षाची नाचक्की झाली. या कार्यक्रमावर निलेश लंके गटाने बहिष्कार टाकला होता. मात्र, कार्यक्रम सुरु होताच लंके गटाने सभास्थळी गर्दी करुन शक्तीप्रदर्शन केलेहोते . लंके समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी केली होती.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
विधानसभेसाठी आमदार औटी यांना नीलेश लंके यांचेच आव्हान !
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार विजय औटी यांना नीलेश लंके यांचेच मोठे आव्हान राहणार आहे. त्यादृष्टीने लंके यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू आहे. आमदार औटी यांच्या एकहाती हुकूमशाहीला कंटाळून तालुकाप्रमुख लंकेंच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडाचे निशाण फडकवले आहे.
वाचा सविस्तर -  http://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2711.html


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.