पैशाच्या वादातून कुटुंबास काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विकलेल्या संत्र्याच्या बागेच्या पैशाची मागणी केली असता त्यास नकार दिला असता कुुटुंबियांना शिवीगाळ करत काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राधाकिसन बाबुराव रक्ताटे (रा. शेंडी, ता. जि. नगर) यांनी संत्र्याचा बाग विकला. तेव्हा बाळासाहेब लक्ष्मण सुरवसे (रा. वांबोरी, ता. राहुरी, हल्ली रा.शेंडी ता. जि. नगर) यांना विकलेल्या संत्र्याच्या बागेच्या पैशाची मागणी रक्ताटे यांच्या कुटुंबियास केली असता रक्ताटे यांच्या मुलीने ते देण्यास नकार दिला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तेव्हा सुरसे याने हातातील लाकडी काठी व लाथाबुक्क्याने रामकिसन रक्ताटे, त्यांची पत्नी व मुलगी यांना मारहाण केली. यामध्ये रक्ताटे यांच्या पत्नी व मुलगी या दोघी जखमी झाल्या असून पैसे न दिल्यास रक्ताटे यांना जिवे मारण्याची धमकी सुरसे याने दिली आहे. याप्रकरणी रक्ताटे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात बाळासाहेब सुरसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पालवे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.