कोपरगावचा अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद तडीपार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव येथील नगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद याला नगर जिल्हा तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला, निफाड तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काल बजावला, अशी माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी पत्रकारांना दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
डॉ. पाटील म्हणाले, सय्यद याच्यावर विविध पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात दंगे घडविणे, एका वृत्तपत्राचे कार्यालय फोडणे आदीचा त्यात समावेश आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी रात्री ९ वाजता आदेश बजावला आहे. २४ तासात हद्दीबाहेर जायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.