चिंचेच्या झाडाला गळफास घेवून तरूणाची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील रोहीत दिलीप वर्पे (वय २४) याने शेतातील घराजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाला दोरीच्या साह्याने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
रोहीत वर्पे हा संगमनेर येथील संगमनेर महाविद्यालयात एमस्सी (गणित) चे शिक्षण घेत होता. रोहीत रविवारी रात्री उशिरापर्यंत घरी अभ्यास करत होता. सकाळी रोहीत घरी दिसला नाही म्हणून घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता शेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाला रोहितने आत्महत्या केल्याचे दिसले. 

रोहितने आपल्या वहीत मी आत्महत्या करत आहे त्यास कोणासही जबाबदार धरू नये. अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलीस पाटील राजेंद्र शेटे यांनी सकाळी शिर्डी पोलीस ठाण्याला सदर घटनेची खबर दिली. शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक शेंडगे व पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मृतदेह शवविच्छेदनासाठी राहता येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर अतिशय शोकाकुल वातावरणात रांजणगाव देशमुख येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.