पोलिस भरती पारदर्शकपणे पार पडणार: रंजनकुमार शर्मा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा पोलिस दलात १६४ पदांसाठी १२ मार्चपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून आतापर्यंत यासाठी ३० हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. जवळपास एक महिनाभर ही भरती प्रक्रिया सुरू राहणार असून भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता सामारे जावे, ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक रंजणकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्री. शर्मा पुढे म्हणाले की, भरती प्रक्रिया पारदर्शकपणे संपन्न होण्यासाठी तसेच गैरव्यवहार रोखण्यासाठी पोलिस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांची पहिले नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर त्यांची उंची व छातीचे प्रमाण मोजून त्यांचे ओळखपत्र तयार करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांचे थंम्ब इंप्रेशन (अंगठ्याचा ठसा) घेतला जाणार आहे. 

शारिरीक चाचणी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लेखी परिक्षा देताना पुन्हा त्यांच्या अंगठ्याचा ठसा तपासला जाणार असून यामुळे लेखी परिक्षेस डमी उमेदवार बसविण्याच्या प्रकारास आळा बसणार असल्याचे श्री. शर्मा म्हणाले. जवळपास महिनाभर ही प्रक्रिया सुरू राहणार असून दररोज दिड हजार उमेदवारांची शारिरीक चाचणी घेतली जाणार आहे. 

यावेळी भरती होत असलेल्या परिसराच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार असून भरतीचे व्हिडीओ रेकॉर्डींगही केली जाणार आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आजूबाजूच्या परिसरात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तैनात करण्यात येणार आहे. शारिरीक चाचणी दरम्यान सोळाशे मिटर धावण्याच्या प्रकारात पहिल्यांदाच आरएफआरडी या तंत्राचा वापर केला जाणार असून याद्वारे धावणाऱ्याची अचूक वेळीची नोंद होण्यास मदत होणार आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्नशील.भरती प्रक्रिया म्हटले की, उमेदवारांचे राहण्याची होणारी गैरसोय ही दरवर्षीची बाब आहे. मात्र यावेळी ही गैरसोय टाळण्यासाठी श्री. शर्मा यांनी चांगली पाऊले उचलली असून भरतीला दररोज येणाऱ्या जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांची सोय पोलिस हेडकॉर्टरमधील शेडमध्ये करण्यात येणार असून काही मंगल कार्यालयांशीही याबाबत चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर रात्रीच्या सुमारास बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी परिसरात पोलिसांच्या वाहणांची उमेदवारांसाठी येण्या-जाण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असून या उपक्रमासाठी काही सामाजिक संस्थाही पुढाकार घेत असल्याची श्री. शर्मा म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.