सरकारविरोधात 19 मार्चला शेतकरी संघटनांचे आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध शेतकरी संघटनांच्या राज्य सुकाणू समितीने एल्गार पुकारला असून, चार टप्प्यांचे राज्यव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. शेतकरी आंदोलनाची टप्पेनिहाय तयारी तसेच नियोजन करण्यासाठी जिल्हा सुकाणू समितीची महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब पटारे व जिल्हा सुकाणू समितीचे समन्वयक बन्सी सातपुते, मेहबूब सय्यद, अशोक पटारे, बच्चू मोढवे, प्रकाश पोटे, विनोदसिंग परदेशी, भैरवनाथ वाकळे, रामदास वागस्कर, विजय केदारे, आर. डी. चौधरी, विठ्ठल माळी, विकास गेंरगे, सागर बनकर, विलास कदम, तुषार सोनवणे, अरूण शिंदे, संतोष तोडमल, नंदकुमार वऱ्हाळ, जयदीप पटारे, शुभम तोडमल, बिलाल पठाण, आदी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जाहीर केलेल्या चार टप्प्यातील आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर दि. 1 मार्च 2018 पासून कर कर्ज देणार नाही, विजेचे बिलही देणार नाही, या भूमिकेनुसार असहकार आंदोलनाला सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दि. 19 मार्च 1986 रोजी सरकारच्या धोरणांचे पहिले बळी ठरलेले शेतकरी साहेबराव करपे यांच्या कुटुंबासह आत्महत्येला येत्या 19 मार्च रोजी 32 वर्ष पूर्ण होत आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
स्व. साहेबराव करपे ते धर्मा पाटील या दरम्यान महाराष्ट्रातील 75 हजार शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून केलेल्या आत्महत्या म्हणजेच सरकारने शेतकऱ्यांचे केलेले खून आहेत. या सर्व अन्नदात्यांच्या स्मरणार्थ एक दिवस अन्नत्याग करून सरकारने वाढत्या शेतकरी रोखण्यासाठी यापुढे तरी धोरणात बदल करावा. यासाठी सरकारला शहाणपण सुचावे म्हणून येत्या दि. 19 मार्च रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हा सुकाणू समितीने जाहीर केले. 

तसेच दि. 23 मार्च रोजी शहीद दिनापासून राज्यभर हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रेला तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाने सुरूवात होणार असून, 30 एप्रिलला सत्याग्रह करून जेलभरो आंदोलनाने चौथ्या टप्प्यातील आंदोलनाची सांगता होईल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.